maxwoman
maxwoman

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा जागेसाठी आज होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रमुख दावेदार काँग्रेस आणि भाजपसह तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसला आपली जागा जिंकायची आहे. तर पंढरपूरमधील पुनरावृत्ती करण्याची संधी भाजपने आखली आहे.

    संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात पासून मतदानाला सुरूवात झालीय. कांग्रेसचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजप, महाविकास आघाडी, वंचितच्या उमेदवारात चुरस निर्माण झाली आहे.

    निवडणूक प्रक्रीयेत सहभागी असलेले कर्मचारी काल रात्रीचं ईव्हीएम मशीन घेऊन वाहनातून मतदान केंद्राकडे मुक्कामी पोहोचले. निवडणूक रिंगणात 12 उमेदवार आहेत. तर, तीन लाख मतदार आहेत. 412 मतदान केंद्रावर मतदान होत आहे.

    यात आठ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जवळपास 2000 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेत कार्यरत असून, कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

    वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. कोविड नियमावलीमुळे या मतदान प्रक्रियेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर थर्मल तपासणी करून मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.