On the second day of the wedding in Hingoli, the bride fled the house with cash and jewelery

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नववधू घरातील रोकड आणि दागिने घेऊन फरार झाली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेलुद येथील नवरदेवाची लग्नाच्या नावावर फसवणुक झाली आहे (On the second day of the wedding in Hingoli, the bride fled the house with cash and jewelery) 

    जालना : लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नववधू घरातील रोकड आणि दागिने घेऊन फरार झाली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेलुद येथील नवरदेवाची लग्नाच्या नावावर फसवणुक झाली आहे (On the second day of the wedding in Hingoli, the bride fled the house with cash and jewelery)

    एका शेतकरी परिवारामधील तरुणाचा हिंगोली जिल्ह्यातील नव वधु सोबत दोन दिवसापूर्वी परिसरातील एका मंदिरात विधीवत विवाह जाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम व अंगावरील दागिने घेऊन फरार झाली. याची रक्कम अंदाजे तीन लाखांच्या आसपास आहे.

    शेलुद येथील काकडे परिवाराला गंडा देऊन ही नवी नवरी फरार झाली आहे.  याप्रकरणी राजू दौलत काकडे यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस स्टेशन मध्ये नव वधु विरुद्ध खरे नाव अद्याप माहीत नसल्यामुळे व तिचे पाच सहकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.

    आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या टोळी विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे की भोळ्याभाबड्या शेतकरी परिवारांना या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवून नवरी पाहून देतो म्हणून लग्न लावून देतात. अवघ्या दोन तिन दिवसातच नवरी रोख रक्कम घेऊन फरार होते या फसवेगिरी करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.