तुळजाभवानी मंदिरासमोर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन

BJP च्या आध्यात्मिक समनव्य आघाडीच्यावतीने राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. मंदिर हम खुलवायेगे , धर्म को न्याय दिलायेगे असा नारा देत सोमवारी 30 ऑगस्ट रोजी राज्यभर प्रमुख मंदिरासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

    उस्मानाबाद (Osmanabad) : आमदार राणाजगजितसिंह पाटील (MLA Rana Jagjit Singh Patil) यांच्या नेतृत्वाखाली आई तुळजाभवानी मंदीरासमोर (Tulja Bhavani temple) भाजपाने आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शंखानाद आंदोलन केले. राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) आध्यात्मिक समनव्य आघाडीच्यावतीने राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. मंदिर हम खुलवायेगे , धर्म को न्याय दिलायेगे असा नारा देत सोमवारी 30 ऑगस्ट रोजी राज्यभर प्रमुख मंदिरासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

    तुळजाभवानी मंदिर समोर सकाळी ११ वाजता आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘मंदिर बंद, गरीबांचे हाल ठाकरे सरकार मालामाल व मंदिर बंद, उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार’ असा आरोप आमदार राणा यांनी केला आहे. देव धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या अधर्मी आणि जुलमी ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याचा इशारा देण्यासाठी भाजपाने हे शंखनाद आंदोलन केले .राज्यातील विविध मंदिरासमोर हे आंदोलन झाले आहे.