उस्मानाबादच्या उमेश खोसे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, त्यांचं कार्य पाहून तुम्ही देखील म्हणाल ‘क्या बात है सरजी’

ज्या आदिवासी तांड्यांवर ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क नाही अशा तांड्यावर राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मिळायला हवे यासाठी रघुनाथ खोसे यांनी 51 ऑफलाईन अँपची निर्मिती केली. त्यामुळे नेटवर्क नसलं तरी मुलांचे शिक्षण सुरु आहे.

    उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत असलेले शिक्षक उमेश खोसे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.

    भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील 45 शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांची निवड झाली असुन मराठवाड्यातील उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे.

    ज्या आदिवासी तांड्यांवर ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क नाही अशा तांड्यावर राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मिळायला हवे यासाठी रघुनाथ खोसे यांनी 51 ऑफलाईन अँपची निर्मिती केली. त्यामुळे नेटवर्क नसलं तरी मुलांचे शिक्षण सुरु आहे.

    एवढंच नाही तर या सरांनी तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी बंजारा भाषेत इयत्ता पहिलीचं पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादर केले आहेत.

    मुलांना आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी ऑफलाईन अँप्स, गेम्स, टेस्ट तयार केलेल्या आहेत. एवढंच नाही तर कोरोना काळात या सरांची शाळा ऑनलाईन व ऑफलाईन 365 दिवस सुरू आहे. मुले दीक्षा अँप तसेच इतर साधनांच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. उपक्रमशील शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारे गौरव केला आहे.