संप करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर नोकरीवरुन काढले; निलंबनाच्या भीतीमुळे उस्मानाबादमध्ये ST कर्मचाऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे(Fired ST workers on strike; ST employee dies in Osmanabad due to fear of suspension). किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे(Fired ST workers on strike; ST employee dies in Osmanabad due to fear of suspension). किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. राज्यसरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या आहेत.

    आपल्या इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीने हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.