100 कोटी द्या, नाही तर माफी मागा; परिवहनमंत्री अनिल परब यांचा किरीट सोमय्यांना इशारा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचा कोकणात समुद्र किनाऱ्याजवळ अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांच्या आरोपांनंतर परब यांना ईडी चौकशीला देखील सामोरे जावे लागले. या आरोपांवरून परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. सोमय्या यांनी एकतर 100 कोटी रुपये द्यावे नाही तर माफी मागावी, असा इशारा आता परब यांनी दिला आहे(Give 100 crores, if not apologize; Transport Minister Anil Parab warns Kirit Somaiya).

  उस्मानाबाद : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांचा कोकणात समुद्र किनाऱ्याजवळ अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांच्या आरोपांनंतर परब यांना ईडी चौकशीला देखील सामोरे जावे लागले. या आरोपांवरून परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. सोमय्या यांनी एकतर 100 कोटी रुपये द्यावे नाही तर माफी मागावी, असा इशारा आता परब यांनी दिला आहे(Give 100 crores, if not apologize; Transport Minister Anil Parab warns Kirit Somaiya).

  महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासातून, या रिसोर्टशी माझा काहीच संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे. कागदोपत्री आयकर विभाग, ईडी सगळीकडे याबाबत चौकशी झाली पाहिजे. यामधून खरे निष्पन्न झालेले आहे. तरीदेखील सोमय्या माझ्याविरोधात आरोप करत आहेत. याबद्दल मी त्यांच्याविरोधात मानहाणीचा दावा केला आहे. या दाव्यामध्ये एकतर त्यांना मला 100 कोटी द्यावे लागतील, नाहीतर माफी मागावी लागेल असे अनिल परब म्हणाले.

  आर्थिक कमाईसाठी तिसऱ्या लाटेच्या धमक्या

  स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने काही सत्ताधारी नेते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती जनतेमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी काही सत्ताधारी नेते कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे, असे सोमय्या म्हणाले.

  ऑमीक्रोनच्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाही. दोन, तीन दिवसांमध्ये लोक बरी होत आहेत. खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांना दाखवली जात असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.

  एसटी आंदोलनामुळे 600 कोटींचे नुकसान

  एसटी आंदोलनामुळे राज्याचे जवळपास 600 कोटींचे नुकसान झाले आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करतो आहे. समिती या बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत. मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत त्यांनी एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन परब यांनी केले. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असेही ते म्हणाले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022