Rain Maharashtra
Rain Maharashtra

आज असाच पाऊस राहिला तर मांजरानदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.वाशी तालुक्यातील फक्राबाद या गावाचा पारा नांदूर याठिकाणी संपर्क तुटलेला आहे.

    उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात गेली अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा होती मात्र दोन दिवसापासुन सतत सुरू असलेल्या पाऊसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असुन मांजरा नंदी पुरसदृष्य परिस्थितीत वहात आहे. भूम व वाशी तालुक्यात ऊस, मक्का हे पीकआडवे झाले. तर सोयाबीन, उदिड पिकाचे नुस्कान मोठया प्रमाणात झाले आहे.

    आम्हाला २५ टक्के अग्रीम विमा रक्कम नको तर पूर्ण विमा द्या अशी मागणी शेतकऱ्यातुन जोर धरू लागली आहे . तसेच जोरदार झालेल्या पावसामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. जर आज असाच पाऊस राहिला तर मांजरानदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.वाशी तालुक्यातील फक्राबाद या गावाचा पारा नांदूर याठिकाणी संपर्क तुटलेला आहे. अशीच परिस्थित उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दिसत आहे .