‘जलयुक्त शिवार योजना या सरकारने बंद पाडली, म्हणून महापुर आला’ – देवेंद्र फडणवीस

अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत नाही. विमा एजंट गावागावात फिरत आहे. शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेऊन नुकसानीचा टका वाढण्याचे आमिष देत आहे. ५०० रुपये दिले तर ६० टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर २० टक्के नुकसान दाखवतो, अशा प्रकारे फसवणूक सुरू आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

    उस्मानाबाद : जलयुक्त शिवार योजना राज्य शासनाने बंद पाडली. त्यामुळे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली नाहीत, त्या ठिकाणी नदीच्या पात्राबाहेर पाणी घुसले. त्यामुळे शेती व शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    ”पावसामुळे जमीन वाहून गेली आहे आणि पिके नष्ट झाली आहेत. आम्ही सत्तेत असताना आम्ही प्रति जिल्हा ४००-५०० कोटी रुपयांचा पीक विमा द्यायचो. पण आता परिस्थिती अशी आहे, की शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत, विम्याद्वारे कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच शेतातील वीज जोडणी देखील अद्याप सुरू करण्यात आली नाही,” असं फडणवीस म्हणाले.

    ‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त  नुकसान झाले आहे.  अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत नाही. विमा एजंट गावागावात फिरत आहे. शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेऊन नुकसानीचा टका वाढण्याचे आमिष देत आहे. ५०० रुपये दिले तर ६० टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर २० टक्के नुकसान दाखवतो, अशा प्रकारे फसवणूक सुरू आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

    फडणवीस, दरेकरांनी तेर परिसरातही पाहणी केली. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, सरकारने काहीही मदत केली नाही. आमच्या काळात प्रत्येक जिल्ह्याला ८०० कोटी रुपये पीकविमा मिळाला. आता तर विमा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून रक्‍कम घेत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणी येत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.