राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! उस्मानाबादमध्ये जिल्हा निरीक्षकांच्या कुरघोड्यांना कंटाळून जिल्हाध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुंचबना होत असून अपमानास्पद पध्दतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामुहिक राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा मगर व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले(NCP's internal dispute on the rise! Collective resignation of some office bearers including district presidents in Osmanabad).

    उस्मानाबाद :  राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची कुंचबना होत असून अपमानास्पद पध्दतीने पदाधिकाऱ्यांना पदावरून काढले जात आहे. त्यामुळे आम्ही पदांचा सामुहिक राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा मगर व तालुकाध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले(NCP’s Internal Dispute on the Rise! Collective resignation of some office bearers including district presidents in Osmanabad).

    राज्यपातळीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या जागी इतर महिलांची नियुक्ती केली जात आहे. किमान विश्वासात घेणे किंवा कल्पना देऊन नवीन नेमणुक केल्यास कांही वाटले नसते, परंतु कोणतीही कल्पना न देता अत्यंत अपनास्पद इतरांची नियुक्ती करणे योग्य नसल्याची खंत ॲड. मंजूषा मगर-माडजे यांनी व्यक्त केली.

    विशेष म्हणजे ज्या जिल्हा निरीक्षक आहे. त्या विनाकारण ढवळाढवळ करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे खच्चीकरण केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसमधील २० पदाधिकारी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे देणार असल्याची माहिती ॲड.मगर-माडजे व सुरेखा जाधव यांनी सांगितली.