उस्मानाबाद: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; दोन महिलांसह एकाला अटक

जिल्ह्यातील लोहारा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची दुर्देवी घटना घडली. कार्यालयात कुणीही नसताना संबंधित पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    उस्मानाबाद : जिल्ह्यातील लोहारा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची दुर्देवी घटना घडली. कार्यालयात कुणीही नसताना संबंधित पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    हणमंत दनाणे असे त्याचे नाव असून ही घटना लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात घडली. ते पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. सकाळी शशिकांत डोलारे नावाचा युवक कार्यालयात पोहोचला असता, ही घटना उघडकीस आली.

    पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी त्यांना कार्यालयातच एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत दणाने यांनी गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. त्या आधारावरून पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.