Osmanabad: Police raid a dance bar near Tuljapur city; 64 men including 25 women detained

जिल्ह्यातील तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगा या डान्सबारवर उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने धाड टाकली. यावेळी २५ महिलांसह ६४ पुरुष, २ मॅनेजर व मालकास अटक केली आहे(Osmanabad: Police raid a dance bar near Tuljapur city; 64 men including 25 women detained).

    उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगा या डान्सबारवर उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने धाड टाकली. यावेळी २५ महिलांसह ६४ पुरुष, २ मॅनेजर व मालकास अटक केली आहे(Osmanabad: Police raid a dance bar near Tuljapur city; 64 men including 25 women detained).

    उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली. कळंब विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर येथील येथे गजगा डान्स बार सुरु झाल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

    अटक करण्यात आलेल्या सर्व महिला या परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे तर अटक करण्यात आलेले पुरुष हे ग्राहक असुन ते सोलापूर,गुलबर्गा, कर्नाटक राज्यासह अन्य भागातील आहेत.डान्सबारमध्ये विभतस वर्तन करणे यासह रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरु ठेवणे यासह इतर कारणामुळे कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम २९४,२०८,२६९,१८८ यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत  ६२ लाख ८३ हजार पाचशेचा मुद्देमाल जप्त केला आहे.