४ हजारपेक्षा जास्त महिलांना सक्षम करणाऱ्या महिला उद्योजिका कमलताई कुंभार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार

त्यांनी सुरू केलेल्या कुकूटपालन शेळीपालन घोडे पालन यासारख्या शेती पूरक पशुपालन व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं.

    : उस्मानाबाद जिल्ह्यासह परिसरातील ४ हजारपेक्षा जास्त महिलांना वेगवेगळ्या उद्योग – व्यवसायासाठी मार्गदर्शन करून सक्षम करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील कमलताई कुंभार यांना २०२२ चा नारीशक्ती पुरस्कार नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    कमलताई कुंभार यांच्या कार्याची सुरुवात 1998 मध्ये कमल पोल्ट्री अॅन्ड एकता सखी प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून झाली. यामुळे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात तीन हजार पेक्षा जास्त महिलांना मदत झाली. dत्यानंतर ऊर्जा सखी म्हणून 3000 घरात सौरऊर्जा दिव्यांनी त्यांनी प्रकाश पोहोचवला.

    त्यांनी सुरू केलेल्या कुकूटपालन शेळीपालन घोडे पालन यासारख्या शेती पूरक पशुपालन व्यवसायातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या असूनही त्या आत्मविश्‍वासानं एक एक दमदार पाऊल पुढे टाकत होत्या. एप्रिल 2017 साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला , 29 ऑगस्ट 2017 रोजी नीती आयोगाचा वुमन एक्जप्लर अवार्ड आणि वूमन ट्रान्सफॉर्मींग इंडिया अवार्ड , 17 सप्टेंबर 2017 ला अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे इक्विटा पुरस्कार त्यांना मिळाला , तर आठ मार्च दोन हजार अठरा रोजी इंडिया बँकेचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. भारत सरकारचा महिलांच्या क्षेत्रातील सर्वोच्च नारीशक्ती पुरस्कार नुकताच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यापुढील काळात उस्मानाबाद सह इतर जिल्ह्यातील 9000 महिलांना पशुपालन क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी आत्मविश्वास देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.