सर्वांच्या सहकार्यातून आश्वासक वाटचाल; कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचे प्रतिपादन

गेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

उस्मानाबाद (Osmanabad).  गेल्या दीढ वर्षाच्या कार्याकाळात विद्यापीठातील सर्व अधिकार मंडळाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिपाद दिला. या काळातील वाटचाल आश्वासक असून नवीन दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी २८ नाटयगृहात झाली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. अधिसभा बैठकीस ५५ सदस्य उपस्थित होते. प्रारंभी नवनियुक्त सदस्य डॉ.शाम शिरसाठ, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.योगेश पाटील, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे आदींचा सत्कार करण्यात आला. गेल्या वेळची अधिसभा बैठक १३ मार्च २०२० रोजी झाली. त्यानंतर साडे नऊ महिन्यात झालेली घडामोड, विद्यापीठाने राबविलेले उपक्रम व कोविडच्या काळात विद्यापीठात केले.

सामाजिक कार्य याबद्दलची माहिती मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. ते म्हणाले, कुलगुरु पदाची सुत्रे १६ जुलै २०१९ रोजी घेतल्यापासून विद्यार्थी वेंâद्रीत, पारदर्शक व गतीमान प्रशासन अशी त्रिसुत्री समोर ठेऊन कामकाज सुरु केले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकार-कर्मचारी व विद्यार्थी या तिनही घटकांन परिवर्तनाच्या प्रक्रियेत सकारात्मक साथ दिली. व्यवस्थापन परिषदेसह सर्व अधिकार मंडळाचे ही मोलाचे पाठबळ लाभले.