Type of meteor shower in Osmanabad

प्रभु माळी यांच्या शेतता हा प्रकार घडला आहे. ते नेहमी प्रमाणे शेतामध्ये दररोज काम करीत होते. शुक्रवारी सकाळी ते भाजीपाला तोडण्यासाठीच शेतात आले होते. शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्या समोर लाल रंगाचा भला मोठा दगड येवून पडला. या दगडाचे वजन साधारण:ता अडीच किलो इतके आहे.

  उस्मानाबाद : शेतात काम करत असताना अचानक आकाशातून लाल रंगाचा दगड पडला आणि मागे चौकशीचा फेरा सुरु झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरालगत असलेल्या एका शेतकऱ्याला अनुभव आला आहे.

  प्रभु माळी यांच्या शेतता हा प्रकार घडला आहे. ते नेहमी प्रमाणे शेतामध्ये दररोज काम करीत होते. शुक्रवारी सकाळी ते भाजीपाला तोडण्यासाठीच शेतात आले होते. शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्या समोर लाल रंगाचा भला मोठा दगड येवून पडला. या दगडाचे वजन साधारण:ता अडीच किलो इतके आहे.

  अचानक पडलेला दगड पाहून माळी चांगलेच गोंधळले. आसपासचे नागरीकही दगड पाहण्यासाठी त्यांच्या शेतात आले. यानंतर माळी यांनी हा दगड तहसीलदार नरसिंह जाधव यांच्या स्वाधीन केला. दगड जमिनीवर पडताना विचित्र आवाज आल्याची माहितीही माळी यांनी तहसीलदारांना दिली.
  हा दगड ताब्यात घेतल्यानंतर तहसीदारांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन दगड पडल्या त्या जागेची पाहणी केली.

  या प्रकाराची माहिती तहसीलदार यांनी उस्मानाबाद येथील भुवैज्ञानिक कार्यालयासही देण्यात आली आहे. आता परीक्षणानंतर हा दगड नेमका कसला आहे याची माहिती मिळू शकते.

  हा उल्कापाताचा प्रकार असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संपूर्ण तपासणीनंतरच हा नेमका काय प्रकार आहे हे स्पष्ट होईल. मात्र, या प्रकाराची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.