परभणीत ११२ पोलिसांना कोरोनाची लागण, पोलीस विभागात एकच खळबळ

राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सगळीकडे व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तर राज्य शासनाने संचार बंदीचा निर्णय घेतला. यामुळे कालपासून पंधरा दिवस ताण पोलीस दलावर पडणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करणे, बिना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं या गोष्टी बंधनकारक झाल्या आहेत.

    परभणी : राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहेत. परंतु परभणीमध्ये सेवा देणाऱ्या ११२ पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे परभणीतील पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये १६ पोलीस अधिकारी आहेत. तर ४६ कर्मचारी आणि होमगार्ड १० आहेत.

    राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सगळीकडे व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तर राज्य शासनाने संचार बंदीचा निर्णय घेतला. यामुळे कालपासून पंधरा दिवस ताण पोलीस दलावर पडणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करणे, बिना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं या गोष्टी बंधनकारक झाल्या आहेत. यामुळे पोलिस यंत्रणेवर अधिक ताण पडतो आहे. अशातच तब्बल ११२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.