whatsapp clarifies on privacy policy update amid criticism says no effect on individual chats and calls nrvb

एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सुसाईड नोट फोटो त्याने whatsapp स्टेटसला ठेवला होता. स्टेटस ठेवल्यानंतर काही तासांतच त्याने विषारी द्रव्य प्राशन करत जीवनयात्रा संपवली.

गंगाखेड: एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सुसाईड नोट फोटो त्याने whatsapp स्टेटसला ठेवला होता. स्टेटस ठेवल्यानंतर काही तासांतच त्याने विषारी द्रव्य प्राशन करत जीवनयात्रा संपवली.

चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे ( ३० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धोंडगे हा सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथील रहिवासी आहे. मंगळवारी दुपारी १२:२३ वाजेच्या सुमारास त्याने तीन whatsapp स्टेट्सवर अपडेट केले. यात मी शेतात आहे, माझी उद्या सकाळी माती आहे. सर्वांनी यावे. मला पैश्यामुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे.

माझ्या मुलांचा सांभाळ करावा, पैश्यामुळे मला त्रास झाला असा मजकूर असलेल्या चीठ्यांचे फोटो स्टेट्सवर ठेवले. यानंतर त्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले.

चंद्रकांत याने व्हाट्सअप स्टेट्सवर ठेवलेल्या माहिती त्याचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. यावेळी चंद्रकांत अत्यवस्थ अवस्थेत दिसला. दुपारी १:३५ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी,एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याचे जमादार एम जी सावंत, जमादार गोविंद मुरकुटे यांनी शवविच्छेदनापूर्वी पंचनामा केला. याची कागदपत्रे सोनपेठ पोलीसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरु आहे.