पुढच्या ८ दिवसात शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा… ; रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला ईशारा

सरकारवर शेतकरी नाराज आहे, अशी टीका करत आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे.

    परभणी : राज्यात गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला असून सर्वत्र पिकांची मोठी हानी झाली आहे. यावर भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते शेतकऱ्यांचा बांधावरून जात आहेत.

    मात्र, काँग्रेसचा कोणीही मंत्री नेता, पालकमंत्री अजून शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही. या आघाडी सरकारच्या नेत्यांकडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नाही असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीत केलं आहे.

    दानवे नेमकं काय म्हणाले?

    सरकारवर शेतकरी नाराज आहे, अशी टीका करत आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी दानवेंनी सरकारला दिला आहे. दानवेंनी परभणी जिल्ह्यातील ७ म्हसुल मंडळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. रात्री उशिरा आनंद भरोसे यांच्या घरी माध्यमांशी बातचीत करतांना त्यांनी थेट मवीआ सरकारला आव्हान दिलं आहे.