Outbreak of bird flu in Maharashtra Alert in Parbhani district; By evening, ten thousand hens will be killed and buried in the pit

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल दहा हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे.

परभणी : महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव केला आहे. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल दहा हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे.

मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या गावात कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धक विभागाचं पथक येथे तैनात आहे.

या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं असून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकी नंतर उपययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री काही महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.