अल्कोहोल
अल्कोहोल

मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या चक्क सभागृहात काही नगरसेवकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी गटारी साजरी केली. जेथे ही पार्टी झाली, त्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात सीसीटीव्ही असल्याने सारी पार्टी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याचा व्हिडिओ जिल्ह्यात व्हायरल झाला असून त्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केबिनमध्ये मद्यपान करताना दिसत आहेत. तसेच नगरसेवक बिर्याणीवर ताव मारण्यात मग्न आहेत. या प्रकरणात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    परभणी : मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या चक्क सभागृहात काही नगरसेवकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी गटारी साजरी केली. जेथे ही पार्टी झाली, त्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात सीसीटीव्ही असल्याने सारी पार्टी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याचा व्हिडिओ जिल्ह्यात व्हायरल झाला असून त्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केबिनमध्ये मद्यपान करताना दिसत आहेत. तसेच नगरसेवक बिर्याणीवर ताव मारण्यात मग्न आहेत. या प्रकरणात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    व्हायरल व्हिडीओनंतर या प्रकाराचा सर्वत्र निषेध होत असून काँग्रेस, शिवसेना, मनसेकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेने तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोमटे यांना निलंबित करण्याची मागणी केली. रविवारी दर्श आमावस्या होती. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने या आमावस्येला गटारी आमावस्या म्हणूनही ओळखले जाते.