परभणीत कडक निर्बंध; ३१ मार्च पर्यंत संचारबंदी लागू

महाराष्ट्रातल्या इतरही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे कळते.

    परभणी. सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा अत्यंत चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर  परभणी (parbhani) जिल्ह्यांत  २४ ते ३१ मार्च दरम्यान ७ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्चला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ३१ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील असे जिल्हाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

    महाराष्ट्रातल्या इतरही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे कळते.