ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; बाहेरील जिल्ह्यातून येणारा ऊस थांबविला

माजलगाव तालुक्यात जवळपास पंधरा लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. असं असताना बाहेरून स्वस्त दरात ऊस आणला जातोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला उस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

    बीड – परभणी जिल्ह्यातून आणला जाणारा ऊस हा तात्काळ थांबविण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बीड आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर आंदोलन केले. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक असताना इतर जिल्ह्यातून ऊस आणण्याचा घाट का घातला जातोय? असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले आहे.

    माजलगाव तालुक्यात जवळपास पंधरा लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. असं असताना बाहेरून स्वस्त दरात ऊस आणला जातोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला उस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच इथल्या कारखान्यावर कारखानदारांची मनमानी सुरू असून इथे प्रशासक नेमण्यात यावेत अशी मागणी स्त्री संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.