सावकारांच्या जाचाला कंटाळून दोघांची आत्महत्या; हातावर आरोपींच्या नावांचा उल्लेख

क्षीरसागर हा मिस्त्री काम करीत होता. त्याच्या हाताला काम नव्हते. रितेश काम नसल्यानं घेतलेल्या कर्जाचं व्याज शंभर रुपये देऊ शकत नव्हता. शव विच्छेदनात त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  परभणी (Parbhani) : जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून (harassment of moneylenders) दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांनी त्यांच्या हातावर सावकारांची नावे लिहून आत्महत्या केली. अजय घुगे (Ajay Ghuge) यांच्याकडून रितेश बंडू क्षीरसागर (Riteish Bandu Kshirsagar) याने काही पैसे व्याजाने घेतले होते. त्याचे व्याज रोज शंभर रुपये त्याला द्यावे लागत होते. सावकारांनी (the lenders) व्याजाचा तगादा लावल्यानं दोघांनी आत्महत्या केली आहे. परभणीत या घटनेमुळं खळबळ माजली आहे.

  व्याजासाठी तगादा
  रितेश क्षीरसागर हा मिस्त्री काम करीत होता. त्याच्या हाताला काम नव्हते. रितेश काम नसल्यानं घेतलेल्या कर्जाचं व्याज शंभर रुपये देऊ शकत नव्हता. पण अजय घुगे, सुनील मुंडे, हनुमंत घुगे आणि ऋषी हे त्याच्याकडे रोज पैशांचची मागणी करीत त्याला मारण्याची धमकी देत होते. त्या कर्जाचा भार सहन होत नव्हता म्हणून त्याने आत्महत्या केली. अशी तक्रार रितेश क्षीरसागर याची आई मीरा क्षीरसागर यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

  मुद्दल न घेता व्याजसाठी तगादा 
  सुनील पारवे हे होम थिएटर दुरुस्तीचे काम कराय चे अजय घुगे यांनी होम थिएटर दुरुस्ती साठी पारवे यांना 5 हजार रुपये दिले होते. होम थिएटर दुरूस्तीला वेळ लागत असल्याने आरोपी पारवे यांना त्रास देऊ लागले. त्यानंतर पैसे परत करण्याचे ठरले; परंतू पैसे न घेता आरोपी दिलेल्या पैशावर व्याज मागत होते; मात्र पारवे यांच्या कडे तेवढे पैसे नसल्याने आरोपी त्यांना धमकी देत होते.

  सावकाराच्या त्रासाला कंटाळून दोघांची आत्महत्या
  सावकारी जाचाला कंटाळून या दोघांनी मृत्यू पूर्वी विषारी औषध प्राशन करून रितेश क्षीरसागर आणि सूनील पारवे हे दोघे सोनपेठ शहरातील बाबापिर रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. त्यांना परळी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  रितेश क्षीरसागर आणि सूनील पारवे यांच्या शव विच्छेदनात त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्यात कलम 306,504 भादवी 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 39/45 सहकलम महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 याप्रमाणे सावकार अजय घुगे,सुनील मुंडे, हनुमंत घुगे आणि ऋषी कौडगावकर या चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. सोनपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सावकारांवर काय कारवाई होणार याकडं जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.