संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतून तिचे कपडे जाळल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगरमध्ये (Crime News) घडला. ही घटना बुधवारी (दि.18) घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

    हिंगोली : पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतले. त्यामधे तिच्या चेहऱ्याला इजा झाली. तसेच त्याने तिचे कपडेही जाळल्याचा धक्कादायक प्रकार गाडगेनगरमध्ये (Crime News) घडला. ही घटना बुधवारी (दि.18) घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिस तक्रारीनुसार, या महिलेचे लग्न झाल्यानंतर दोन अपत्ये झाली. संशयी पती हा तिच्याशी वाद करत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने 2017 मध्ये पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार पण दिली. त्यानंतर समुपदेशावेळी आता त्रास देणार नाही, अशी ग्वाही पतीने लेखी दिली. त्यामुळे पत्नी पुन्हा पतीकडे गेली. दोन महिन्यांपूर्वी एकदा माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून पुन्हा पतीने पत्नीशी वाद केला. तिने पैसे आणण्यास नकार दिला. त्यावेळी पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर थेट गरम पाणी फेकले. त्यामुळे आठ टक्के भाजल्या गेली. मात्र, मुलांकडे बघून तिने पतीचा हा त्राससुध्दा सहन केला.

    पण नंतर बुधवारी पतीने घराचे दार बंद करून पत्नीला मारहाण केली आणि तिचे कपडे जाळून टाकले. त्यानंतर पत्नी आपल्या भावाकडे गेली. दरम्यान, पतीनेच पत्नी पळून गेल्याची तक्रार पोलिसांत दिली. याबाबत पोलिसांनी त्यांच्या भावाला मोबाइलवर कॉल करून कळविले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार पुढे आला.