संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असताना हवामान विभागाने विदर्भासह जिल्ह्यात पुढील चार दिवसात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain News) वर्तविली असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.

    हिंगोली : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असताना हवामान विभागाने विदर्भासह जिल्ह्यात पुढील चार दिवसात एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain News) वर्तविली असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.

    सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी धान कापणी व मळणीच्या कामात व्यस्त आहेत. अनेकांची धान कापणी झाली असून, काहींनी धानाचे पुंजणे तयार केले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या धानाच्या कळपा अद्यापही शेतात पडून आहेत. अशातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण निर्माण झाल्याने रब्बीच्या पिकांसाठी ही बाब निश्चित धोकादायक ठरणारी ठरु पाहत आहेत.

    या ढगाळी वातावरणामुळे तूर, तीळ, हरभरा पिकांवर परिणाम पडण्याची चिन्हे असतानाच आता हवामान विभागाने विदर्भासह जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 25 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

    दरम्यान, अवकाळी पावसाचे आगमन जिल्ह्यात झाल्याने शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसण्याची शक्यता बळावली असल्याने शेतकरी धास्तावला आहे.