
संघाची जागा बळजबरीने घेऊन कोल्हापूरचे (Kolhapur News) नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे, म्हणून त्याला कोणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात संघाचे 40 हजार सभासद आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार-चार मतदार आहेत.
कोल्हापूर : संघाची जागा बळजबरीने घेऊन कोल्हापूरचे (Kolhapur News) नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे, म्हणून त्याला कोणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात संघाचे 40 हजार सभासद आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार-चार मतदार आहेत. त्यामुळे हे दोन लाख मतदार येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा अशासकीय मंडळाचे सदस्य अजितसिंह मोहिते (Ajit Singh Mohite) यांनी दिला आहे.
पालकमंत्री केसरकर यांनी मेन राजाराम हायस्कूल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न हाणून पाडला. आता शेतकरी संघ ताब्यात घेण्याचा डाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हाताला धरून सर्व कारस्थान सुरू आहे. शिवाय केसरकर यांना मतांचा धोका नसल्याने त्यांच्या आडून सरकार कोणताही निर्णय घेत आहे. एकीकडे पालकमंत्री केसरकर जयपूरच्या धर्तीवर विकास करू म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे काही दिसत नसल्याचा आरोप अशासकीय मंडळाने केला.
दरम्यान, साठ वर्षांपूर्वी बाजार मॉलची पहिली संकल्पना कोल्हापुरात राबवून शेतकरी संघ नावारूपाला आला. बघता बघता शेतकरी संघांचे जाळे राज्यभरात पसरले. शेतकरी संघाचा बैल ऐटीत उभा राहिला. पण मध्यंतरीच्या काळात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले अन् बैल रुतून बसला. प्रशासकीय मंडळ नियुक्त झाल्यानंतर शेतकरी संघाला चांगले दिवस येऊ लागले. रुतलेला बैल पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत राज्य सरकार त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.