निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे, विद्यावेतनात सरकारकडून वाढ; रुग्णसेवा पूर्ववत

राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. असे असताना आता राज्य सरकारने विद्यावेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.

    मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. असे असताना आता राज्य सरकारने विद्यावेतन वाढवल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. संप मागे घेतल्यानंतर निवासी डॉक्टर पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत.

    राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्याची भूमिका जाहीर करत आभार व्यक्त केले. त्यामुळे निवासी डॉक्टरांकडून संप मागे घेत असल्याची घोषणा रविवारी (दि.25) करण्यात आली आहे.

    आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व रहिवासी आणि मार्ड प्रतिनिधींचे आभार मानतो. निवासी डॉक्टरांच्या संपात सक्रिय सहभाग घेतला आणि एकता दाखवली. त्यामुळेच निवासी डॉक्टरांचा हा अभूतपूर्व विजय झाला. निर्णायक उपाययोजना केल्याबद्दल आम्ही केंद्रीय मार्डचे आभारी आहोत. केंद्रातील मार्ड आणि राज्यातील निवासी डॉक्टरांना दिलेली आश्वासने पूर्ण करा, असे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने म्हणजेच सेंट्रल मार्डने पत्राद्वारे म्हटले आहे.