
दौंड शहरातील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकून लॉजवर नेऊन कोल्ड्रिंक्समध्ये औषध टाकून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी एका नराधमावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, हा नराधम गुन्हा दाखल होताच फरार झाला असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत, ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
पाटस : दौंड शहरातील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकून लॉजवर नेऊन कोल्ड्रिंक्समध्ये औषध टाकून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी एका नराधमावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, हा नराधम गुन्हा दाखल होताच फरार झाला असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत, ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
मयुर रमेश भोसले (रा. दौंड, ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड शहरात राहणारी पीडित महिला व आरोपी या दोघांची डिसेंबर २०२१ मध्ये सोशल नेटवर्किंग साइटवरून ओळख झाली होती. त्यानंतर पीडित महिलेला आरोपीने दौंड येथील वायफाय कनेक्शन ऑफीसमध्ये कामाला ठेवले होते. त्यावेळी त्याने आपले लग्न झाले असून, मला एक लहान मुलगी आहे असे पीडितेला सांगितले होते. तसेच तुझ्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लग्न करतो, असे त्याने या पिडीत महिलेला आश्वासन दिले होते. मात्र, लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने दौंड परिसरातील लॉजवर नेऊन कसले तरी औषध कोल्ड्रीक्स मध्ये देवून पिडीतेसोबत वेळोवेळी शारीरीक सबंध ठेवले. तसेच मोबाईलमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ काढले.
घरी जाऊन केली मारहाण
पिडीत महिलेने पतीचा घटस्फोट घेतल्यानंतर लग्नाबाबत विचारले असता, घरच्यांना विचारून आपण लग्न करू असे सांगितले, मात्र त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. यावरून या दोघांमध्ये भांडणे झाली. आरोपीने पिडीत महिलेच्या घरी जाऊन तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच तिच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केली. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे आणि माझे सोबतचे फोटो सोशल मिडीयावर टाकील. तसेच तुझ्या मुलीला तुला मी जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली.