रविवारी किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव

मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष असलेले महाराष्ट्रातील गड किल्ले हे सर्वच मावळ्यांचे श्रद्धास्थान आहेत.  याच भावनेतून परळी भागातील मावळ्यांकडून 'एक मशाल शिवरायांच्या चरणी' या संकल्पनेतून रविवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    सातारा : मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष असलेले महाराष्ट्रातील गड किल्ले हे सर्वच मावळ्यांचे श्रद्धास्थान आहेत.  याच भावनेतून परळी भागातील मावळ्यांकडून ‘एक मशाल शिवरायांच्या चरणी’ या संकल्पनेतून रविवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    रविवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता सज्जनगड वाहनतळ येथे महाराज पालखीमध्ये स्थानापन्न होणार असुन महाराजांचे औक्षण पूजन व ध्वज पूजन होईल .पहाटे साडेतीन वाजता महाराज धगधगत्या मशाली, शिवराय, शंभुराजे समर्थ रामदास स्वामी, जय श्रीराम, हर महादेवच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड कडे मार्गस्थ होणार. यावेळी सर्व बांधव पारंपारिक पोशाखामध्ये उपस्थित राहणार असून शिंग, तुतारी, हलगी पथक सारख्या वाद्यांच्या गजरात शेकडो धगधगत्या मशालींच्या समवेत मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.

    वाहनतळापासून छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी राजे यांच्या पालख्यांची मिरवणूक पहाटे पावणेचार वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार तसेच श्री समर्थ महाद्वार मधून अंगाई देवीचे दर्शन घेऊन महाराज धाब्याच्या मारुतीकडे मार्गस्थ होतील यावेळी दैदिप्यमान अशी आतषबाजी करण्यात येणार आहे पहाटे चार ते पाच दरम्यान धाब्याचा मारुती मंदिर परिसरामध्ये मावळ्यांकडून इतिहास ज्वलंत करेल असा भव्य दिव्य आगीचा मर्दानी खेळ होईल पहाटे पाच वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर / श्रीराम मंदिराकडे प्रस्थान करतील. पहाटे सहा वाजता श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर / श्रीराम मंदिर परिसरामध्ये तलवारबाजी लाठीकाठी सारखे साहसी खेळ होतील. सकाळी सात वाजता सर्व उपस्थितांच्या खड्या आवाजामध्ये प्रेरणा मंत्र तसेच ध्येयमंत्र उच्चारण होईल आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. यावेळी सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे मुंबई परिसरातूनही शेकडो शिवसमर्थ भक्त दुर्गप्रेमी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दुर्गनाद प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.