मुंबई महानगरपालिकेत मास्क घोटाळा ? साडेनऊ रुपये चढ्या भावाने खरेदी

डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क १४ रुपये ८६ पैसे दराने मास खरेदी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हाच मास राज्य सरकारच्या हपकिनद्वारे अवघ्या ५ रुपये ६१ पैशामध्ये खरेदी करण्यात येतो. त्यामुळे या मास्क खरेदीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग लायसन्स ऑर्डरचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.

    मुंबई – मुंबई महानगरपालिका (BMC) बरखास्त होऊन तब्बल वर्षभराचा कालावधी झालेला असताना घोटाळ्यावर (Scam) घोटाळे समोर येत आहेत यातच आरोग्य विभागाकडून (Health Department) हँड ग्लोज चढ्या दराने खरेदी केल्यानंतर आता पुन्हा महापालिका ५ रुपयाचा एन ९५ मास्क (N95 Mask) तब्बल १४ रुपये ८६ पैसे म्हणजे साडेनऊ रुपये चढ्या भावाने खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यात पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण (Central Procurement Authority) म्हणजेच सीपीडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन होल्डर फाउंडेशन कडून सांगण्यात येत आहे.

    मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या घोटाळ्यासह नालेसफाई, कोविड व अन्य करोडो रुपयाच्या घोटाळ्यांचा समावेश आहे. या घोटाळ्यावरून तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी टार्गेट केले होते. महापालिकेच्या घोटाळ्यासंदर्भात त्याची चौकशी देखील लावण्यात आली आहे. प्रशासक नेमून देखील आठ महिन्याचा कालावधी लोटला. डॉक्टर, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क १४ रुपये ८६ पैसे दराने मास खरेदी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हाच मास राज्य सरकारच्या हपकिनद्वारे अवघ्या ५ रुपये ६१ पैशामध्ये खरेदी करण्यात येतो. त्यामुळे या मास्क खरेदीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग लायसन्स ऑर्डरचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.

    भ्रष्टाचार आरोपातील अधिकाऱ्यांना बढती
    मुंबई महानगरपालिका एक्झामिनेशन ग्लोव्हचा एक बॉक्स १७७ रुपये ते २२६ रुपयामध्ये खरेदी करत होती. आज याच बॉक्ससाठी ९०० रुपये मोजण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पालिकेच्या तिजोरीतून तब्बल नऊ कोटी रुपये खर्च होणार होते. याबाबतचे वृत्त दैनिक नवराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाले होते त्यानंतर या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे ग्लोव्हज खरेदीचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला आहे, मात्र मास्क खरेदीबाबत अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही स्थगिती आलेली नाही. दरम्यान या खरेदीची गंभीर दखल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता मास्कही अधिक किमतीने खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामध्ये घोटाळा केलेल्या काही अधिकारी अजूनही सीपीडीमध्ये असून त्यासोबत काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होऊ नये त्यांना बढती मिळाल्याची बाब समोर आली आहे.