दादरमधील महापालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग, इमारतीचे मोठे नुकसान; तब्बल १६ ते १७ वाहने जळून खाक

मध्यरात्री 1 चा सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

    मुंबईच्या दादर पश्चिमेत कोहिनूर इमारती मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागल्याचा प्रकार समोर आला. मध्यरात्री 1 चा सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही आग लागली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत जवळपास १७ ते १८ वाहने जळून खाक झाली आहेत.

    मात्र, आगीमुळे इमारतीचं तसंच वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दादरमधील कोहिनूर इमारतीत कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच ही आग लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे. कोहिनूर स्क्वेअर इमारत मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आहे. शिवसेना भवन समोरच ही इमारत असून, या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते.