Matang community protests at Divisional Commissioner's Office, demands immediate curb on injustice and atrocities

औरंगाबाद येथे मातंग समाजातील तरुणाची हत्या करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्यामुळे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृतकाच्या कुटुंबियांना १० लाखाची आर्थिक मदत तसेच एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

    अमरावती : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत असल्यामुळे मंगळवारी शेकडो मातंग समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून हल्ला बोल आंदोलन केले. गर्ल्स हायस्कूल चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. पोतराजची वेशभूषा करून हलगी वाद्याच्या तालावर नृत्य करत शासनाचे लक्ष वेधण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला.

    औरंगाबाद येथे मातंग समाजातील तरुणाची हत्या करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्यामुळे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृतकाच्या कुटुंबियांना १० लाखाची आर्थिक मदत तसेच एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामध्ये मागेल त्यांना कर्ज विना अट देऊन समाजाचा विकास करण्यात यावा. या सोबतच समाजाच्या महत्वपूर्ण अन्य मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेसह इतर संघटनांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी विष्णू कसबे, नरेंद्र भोडेकर, पंकज जाधव, गौरव गवळी, दादासाहेब क्षीरसागर, कैलास खंडारे, प्रकाश चमके, सचिन क्षीरसागर, हेमंत खंडारे, डॉ. रूपेश खडसे, अनिल सोनटक्के, गणेश गायकवाड, शंकरराव वानखडे, भारती कांबळे, विजय गायकवाड, प्रकाश डोपे, विठ्ठल कठाले, राजू कुरील, रमेश अवचारे, राजेंद्र तांडेकर, गणेश कलाने, सुरेश गवली, सचिन साबळे, सरिता पोटफोडे, भारत शिंदे, संजय हिवराळे, विनोद तिरळे, उमेश भूजाडणे सह शेकडो मातंग समाज बांधव उपस्थित होते.