मुंबईत मविआच्या मोर्चाला सुरुवात; उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची महामोर्चात उपस्थिती

    आज मुंबईत महामोर्चा काढण्यात सुरुवात झाली असून, दुपारी 12 वाजताच्या सुमारस महामोर्चा निघाला असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमरतीपासून सुरुवात झाली आहे.  शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत.

     

    आदोंलन स्थळी महापुरूषाचे पुतळे उभारण्यात आले

     महाविकास आघाडीचा मोर्चा नेमक कारण काय?

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत केलेले बेताल वक्तव्य अशा राज्यातील विविध मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला आहे,  या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले असून हे बदल सायंकाळपर्यंत कायम असणार आहे.