‘मी आधीच तुमचे ऐकले असते तर…’; MBBS च्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (MBBS) केली. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर येथे घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका वहीत भावनिक गोष्टी लिहिल्या. 'मी तुमचे ऐकले असते. तुम्हाला आधीच सांगितले असते. अभ्यासात लक्ष घातले असते तर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळच आली नसती', असे तिने लिहिले.

    नागपूर : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (MBBS) केली. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर येथे घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एका वहीत भावनिक गोष्टी लिहिल्या. ‘मी तुमचे ऐकले असते. तुम्हाला आधीच सांगितले असते. अभ्यासात लक्ष घातले असते तर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळच आली नसती’, असे तिने लिहिले.

    रिद्धी पालीवाल (वय 20, रा. पारशिवनी, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. रिद्धीचे वडील ओमप्रकाश पालीवाल यांचे पारशिवनी येथे मेडिकल शॉप आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी लक्ष्मीनगरात भाड्याने खोली घेतली. याठिकाणी आई, वडील आणि मुलगा असे तिघे जण राहतात. रिद्धी ही अभ्यासात हुशार होती. बारावीत गुणवत्ता यादीत ती झळकली होती. ती गोंदिया येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. अलीकडे कुठल्यातरी कारणावरून ती तणावात होती.

    सततचा तणाव वाढत गेल्याने ती नैराश्यात गेली. उपचार घेण्यासाठी ती मंगळवारी सकाळी गोंदियावरून आई वडिलांकडे लक्ष्मीनगरात आली होती. मात्र, तिचे मन काही रमत नव्हते. मंगळवारी वडील मेडीकल शॉपला गेले. घरी आई आणि भाऊ होता. दुपारची वेळ असल्याने दोघेही आराम करत होते.

    वहीत लिहिली सुसाईड नोट…

    रिद्धीची अस्वस्थता वाढतच गेली. तिने वही पेन उचलून, ‘मी तुमचे ऐकले असते. तुम्हाला आधीच सांगितले असते. अभ्यासात लक्ष घातले असते तर आज टोकाचे पाऊल उचलण्याची वेळच आली नसती’, असा मजकूर लिहिला. त्यानंतर अंगणातील पाण्याच्या टाकीच्या पाईपला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.