अवैध दारु अड्ड्यावर मेढा पोलिसांचा छापा, ८५  हजारांची दारू जप्त; अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

जावळी (Jawli) तालुक्यात रविवारी दिवशी मेढा (Medha) पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर (Santosh Tasgaonkar) यांनी ७ लाख ९१ हजार रुपयांचा दारू साठा जप्त केल्यानंतर बारा तासात कुडाळ येथेच ८५ हजार रुपयाची दारू बॉक्स अबोली ढाब्यावर छापा टाकून जप्त केले. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

    पाचगणी : जावळी (Jawli) तालुक्यात रविवारी दिवशी मेढा (Medha) पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर (Santosh Tasgaonkar) यांनी ७ लाख ९१ हजार रुपयांचा दारू साठा जप्त केल्यानंतर बारा तासात कुडाळ येथेच ८५ हजार रुपयाची दारू बॉक्स अबोली ढाब्यावर छापा टाकून जप्त केले. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

    या प्रकरणी ढाबा मालक दीपक शामराव वारागडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा, जबरी चोरी, अवैध धंदे यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पोलीस पाहणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अबोली ढाब्यामागे पत्र्याच्या शेडमध्ये दीपक वारागडे याने दारूचे बॉक्स ठेवले असल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर छापा टाकला. यामध्ये देशी विदेशी असे एकूण दारूचे २५ बॉक्स आढळले. हा सर्व दारूसाठा जप्त करण्यात आला.

    एका दिवसात नऊ लाखांची दारू जप्त

    अशा प्रकारे एकाच दिवशी ९ लाख किंमतीचा दारू मुद्देमाल हस्तगत करण्यात मेढा पोलिसांना यश आले. यामुळे आता जावळी तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या विरोधातील मोहीम पोलीस अधिकारी संतोष तासगावकर व त्यांची टीम यशस्वी होऊ लागली आहे. या कामगिरीचे परिसरात कौतूक होत आहे.