Medical experts honored! 25 doctors received Acharya degree, convocation ceremony of the university

सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांना जनरल सर्जरी या विषयात आचार्य पदवीचा सन्मान प्राप्त झाला आहे. डॉ. आदित्य व डॉ. अक्षय केकतपुरे या अस्थि शल्यचिकित्सक बंधूनी या तेराव्या दीक्षान्त समारोहात एकाच वेळी पीएचडी प्राप्त केली आहे.

    वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दीक्षान्त समारोहात तब्बल पंचवीस डॉक्टरांनी पीएचडी प्राप्त केली आहे. विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील या तज्ज्ञांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांना जनरल सर्जरी या विषयात आचार्य पदवीचा सन्मान प्राप्त झाला आहे. डॉ. आदित्य व डॉ. अक्षय केकतपुरे या अस्थि शल्यचिकित्सक बंधूनी या तेराव्या दीक्षान्त समारोहात एकाच वेळी पीएचडी प्राप्त केली आहे. तर, याच अभिमत विद्यापीठातून डॉ. गौरव मिश्रा यांना दोनदा आचार्य पदवी प्राप्त करण्याचा मान लाभला आहे.

    वैद्यकशास्त्रातील विविध विषयांवर प्रबंध सादर करीत डॉ. किरण सावजी, डॉ. राजसबाला धांदे, डॉ. वसंत गावंडे, डॉ. प्रीती कोगडे, डॉ. रीना वासनिक, डॉ. अंजली वग्गा तसेच डॉ. महाकाळकर व डॉ. केकतपुरे यांना या समारोहात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. आयुर्वेद शाखेतून डॉ. साधना मिसर, डॉ. मुजाहिद खान, डॉ. गौरव सावरकर, डॉ. पंकज मुसळे, डॉ. रवीकुमार सूर्यवंशी, डॉ. रीना जयस्वाल, डॉ. गजानन चाटुफळे यांनी आचार्य पदवी प्राप्त केली. नर्सिंग अभ्यासक्रमात लेफ्टनंट कर्नल आशा अब्राहम, नीलिमा रक्षाले, डॉ. उषा शेंडे, डॉ. विश्रांती गिरी, डॉ. सुवर्णा बेद्रे यांनी पीएचडी प्राप्त केली.

    हेल्थ प्रोफेशन्स एज्युकेशन विषयात डॉ. गौरव मिश्रा तसेच डॉ. प्रियांका निरंजने व डॉ. वैशाली कुचेवार तर फिजिओलॉजीमध्ये डॉ. शोभा भावे यांनी आचार्य पदवी प्राप्त केली. या समारोपाला व्यासपीठावर भुवनेश्वर येथील एसओए विद्यापीठाचे प्रकुलपती प्रा. डॉ. अमित बॅनर्जी, जर्मनी येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रामर एजीचे उपाध्यक्ष डॉ. मायकल बॉर्ब, ज्येष्ठ ओरल व मॅक्सिलोफेशिअल सर्जन डॉ. जे. एन. खन्ना (मुंबई) व पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडापे, मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, सागर मेघे, कराड येथील कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर, डॉ. संदीप श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.