मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

सुरुवातीला एक वर्षे जरी मुख्यमंत्री मातोश्रीवर असले तरीही कामकाज सुरु होतेच, सरकारही चालतच होते असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांनी पाठराखण केली. शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य केले, त्याविषयी अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी बोलल्यानंतर मी बोलु शकत नाही.

     

    मुंबई -राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठींबा आहे. महाविकास आघाडी सरकार बहुमतात असून सद्यस्थितीतील पेचप्रसंगावर रणनिती ठरवण्यासाठी शिष्टमंडळासह आज सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

    पवार म्हणाले, आज संध्याकाळी पुढच्या रणनितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहोत. मविआचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहे. नाराजांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करावी. असे मत अजित पवारांनी केले आहे. सुरुवातीला एक वर्षे जरी मुख्यमंत्री मातोश्रीवर असले तरीही कामकाज सुरु होतेच, सरकारही चालतच होते असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांनी पाठराखण केली. शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य केले, त्याविषयी अजित पवार यांनी स्पष्ट केले की, ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी बोलल्यानंतर मी बोलु शकत नाही.