ठरलं! हिवाळी अधिवेशनात मविआ सत्ताधाऱ्यांना घेरणार? उद्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मविआ आमदारांची विधानभवनात बैठक

राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यात या सरकारला यश आले नाही, म्हणून विरोधक आक्रमक होणार असल्याचं बोललं जात आहे. शेतकरी कर्ज, ओला दुष्काळ, पीकविमा, रोजगार, विद्यार्थी, महिला आदी प्रश्नांवर रणनिती या बैठकीत ठरणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील सभागृहात उमटणार आहेत.

    मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session पहिलेच नागपुरात होणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल असं जाहीर केले होतं. मागील तीन वर्षे नागपुरात अधिवेशन झालेले नाही. १९ डिसेंबरला हे अधिवेशन सुरु होणार आहे. साधारण तीन आठवडे हे अधिवेशन चालेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावरुन विरोधक व सत्ताधारी ऐकमेकांत भिडले होते.

    दरम्यान, या हिवाळी अधिवेशनाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. कारण मागील अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळं मूळ प्रश्न बाकी राहिले. त्यामुळं ह्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने रणनिती आखयला सुरुवात केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर उद्या मविआची महत्तावची बैठक विधानभवनात होणार आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे.

    राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यात या सरकारला यश आले नाही, म्हणून विरोधक आक्रमक होणार असल्याचं बोललं जात आहे. शेतकरी कर्ज, ओला दुष्काळ, पीकविमा, रोजगार, विद्यार्थी, महिला आदी प्रश्नांवर रणनिती या बैठकीत ठरणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील सभागृहात उमटणार आहेत. त्यासाठी विरोधकांनी उद्या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटातील आमदार उपस्थित राहणार आहेत.