sharad pawar talking

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. (NCP Leaders Meeting Today) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवून तसेच रणनिती आखून सुद्धा पराभव कसा झाला. याची कारणमिमांसा तसेच पराभवाचे आत्मचिंतन या बैठकीतून होणार आहे.

    मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajysabha election 2022) धक्कादायक निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. (NCP Leaders Meeting Today) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवून तसेच रणनिती आखून सुद्धा पराभव कसा झाला. याची कारणमिमांसा तसेच पराभवाचे आत्मचिंतन या बैठकीतून होणार आहे. तसेच या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीबाबत आणि विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल. तसेच विधान परिषद निवडणुकीला (Legislative Council Election) कसे सामोरी जायचे, या निवडणुकीत रणनिती कशी आखायची याबाबत या बैठकीत खलबतं होणार आहे.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफूल्ल पटेल (Prafull Patel) विजयी झाले. तसेच त्यांना एक अधिक मत मिळाले. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. भाजपने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. हा पराभव कसा झाला. का झाला, अपक्ष कोणत्या आमदारांनी दगाफटका केला आदी विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. शरद पवार या विषयावर स्वतः लक्ष घालून बैठक घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावली आहे.