रावसाहेब दानवे अन् अमोल कोल्हे यांची भेट; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.

    जालना : भाजप नेते, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. दानवेंचे भाऊ भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यावेळी कोल्हे यांना पेशवा पगडी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झालीय. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती कळत आहे. दरम्यान, या चर्चेचा तपशील मात्र कळू शकलेला नाहीय.

    दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीची आणि त्यांच्यात झालेली चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा राजकाणात सुरु आहेत. तर शिर्डीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबीरालाही अमोल कोल्हे गैरहजर होते. यामुळे कोल्हेंच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरु झाली होती. अशातच त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली दोघांमध्ये अर्धा तास चर्चाही झाली. त्यामुळे कोल्हे यांच्या नाराजीच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. मात्र यासंबधी खासदार अमोल कोल्हे यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.