प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ; आ. समाधान आवताडे यांचे कर्मचारी महासंघाच्या कार्यक्रमात आश्वासन

  सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. समाधान आवताडे यांनी दिले.

  जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने रविवारी पंढरपूर येथे राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांचा मेळावा व कृतज्ञता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. आवताडे यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकारी आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले अध्यक्षस्थानी हाेतेे. यावेळी प्रशांत जामोदे, कविता बोंद्रे, ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष संजीव निकम, नर्सेस संघटनेचे राज्य अध्यक्षा शोभा खैरनार, लेखा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस संजय मंठाळकर, शरद भुजबळ, लक्ष्मण वंजारी, सुनंदा सुरवसे, पांडुरंग कविटकर, गुरुनाथ जाधव, प्रफुल माळी, संदीप खरबस, कानिफनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे स्वागत केले. सूत्रसंचालन शरद चाटे यांनी केले. दिनेश बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश बनसोडे, सुरेश राठोड, सचिन मायनाळ, संतोष शर्मा, देवा वाघमारे, संजय देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

   जनतेचा विश्वास संपादन करावा
  कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. लोकाभिमुख प्रशासन राबवून कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. यावेळी प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार आदी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

  शेखर गोतसुर्वे यांना पुरस्कार प्रदान
  जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. दै. नवराष्ट्रचे जिल्हा प्रमुख शेखर गोतसुर्वे यांना सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हा परिषद कर्मचारी मित्र पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले.