रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज Megablock, घराबाहेर पडण्याआधी एकदा ही बातमी वाचाच; नाहीतर सहन करावा लागेल मनस्ताप

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल.

  मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance and Repair Work) आज आपल्या उपनगरीय विभागांवर (Suburban Devision) मेगा ब्लॉक (Mega Block) तर पश्चिम रेल्वेवर चार तासांचा जम्बो ब्लॉक (JumboBlock) घेण्यात येईल.

  मेन मार्ग

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील (Down Line trains will be diverted to the fast line) व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

  घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल.

  हार्बर मार्ग

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर लाईन सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणाऱ्या आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येतील.

  पश्चिम मार्ग

  वसई रोड – भाईंदर स्टेशन्स अप आणि डाऊन फास्ट लाईन्स (००.३० वाजल्यापासून ते ०४.०० वाजेपर्यंत)

  तसेच, हार्बर मार्गावरील माहीम-वांद्रे स्थानकादरम्यान वक्र मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रमुख ब्लॉक

  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी, वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रविवारी, १२ जून, २०२२ रोजी सकाळी ००.३० ते ०४.०० वाजेपर्यंत UP आणि DOWN फास्ट मार्गावर साडेतीन तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.

  ब्लॉक कालावधी दरम्यान, काही UP आणि DOWN उपनगरीय गाड्या रद्द राहतील. यासंबंधीची तपशीलवार माहिती संबंधित स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

  माहीम – वांद्रे स्टेशन अप आणि डाऊन हार्बर लाइन्स (१०.५५ तास – ०४.५५ तास)

  वांद्रे आणि माहीम स्थानकादरम्यान वळणाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी, मध्य रेल्वे ब्लॉकसह रविवार, १२ जून २०२२ रोजी सकाळी १०.५५ ते ०४.५५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावर ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. या सुरू असलेल्या कामामुळे, सर्व डाऊन हार्बर गाड्या माहीम डाऊन हार्बर प्लॅटफॉर्मवर १५ दिवस थांबणार नाहीत.