मतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्धा जिल्ह्यातील (Wardha News)आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मतिमंद युवती (Mentally Retarded Girl) घरी एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला.

    वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha News)आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मतिमंद युवती (Mentally Retarded Girl) घरी एकटी असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडित युवतीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने आष्टी पोलीस ठाण्यात (Ashti Police Station) तक्रार दाखल केली आहे. त्यावरून २५ वर्षीय आरोपी अतुल सुरेश बोरीवार याच्यावर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करत ताब्यात घेतले आहे.

    सोमवारी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ घरी होते. आईवडील शेतमजूर असल्याने नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. काही वेळाने भाऊ मित्रांसोबत बाहेर गेला. थोड्या वेळाने तो घरी परत आल्यानंतर आरोपी हा मुलीच्या घरात होता आणि प्रसंग बघून भावाला मोठा धक्काच बसला. पीडित युवतीच्या भावाला बघून आरोपी अतुल घरातून पळून गेला. आरोपी पळून गेल्यानंतर पीडित युवतीच्या भावाने तिला काकूंकडे बसविले आणि आईला तातडीने घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने थेट आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. आरोपी अतुल बोरीवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.