…म्हणून वडूज नगरीत कर्मवीरनगरचा ‘चिखलनगर’ उल्लेख

नेहमीच येतो पावसाळा तशा पद्धतीने वाढीव नागरिकीकरणाने वडूज नगरीत समस्याही वाढल्या आहेत. ज्याठिकाणी युगपुरुषांची नाव नगरला दिले आहे. तेथील रस्त्यावरील चिखलाने तो परिसर 'चिखल नगर' म्हणूनच ओळखला जात आहे. यावर तातडीने उपाययोजना राबवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

    वडूज : नेहमीच येतो पावसाळा तशा पद्धतीने वाढीव नागरिकीकरणाने वडूज नगरीत समस्याही वाढल्या आहेत. ज्याठिकाणी युगपुरुषांची नाव नगरला दिले आहे. तेथील रस्त्यावरील चिखलाने तो परिसर ‘चिखल नगर’ म्हणूनच ओळखला जात आहे. यावर तातडीने उपाययोजना राबवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

    निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी दिवसातून तीनवेळा प्रचाराची गाडी या भागातून घिरट्या घालत होती. आता त्याला सात महिने झाले आहेत. उन्हाळ्यात खड्डे व पावसाळ्यात चिखल रस्त्यावर असल्याने शाळेकरी लहान मुले व आजारी व्यक्ती,वयोवृद्ध लोकांना या रस्त्याचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. प्रवेशद्वाराजवळ तळे साचले आहे. त्यातच भटक्या प्राण्यांची वर्दळ असल्याने जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना वाहनचालक व प्रवाशांना हेलकावे खावे लागत आहे. काहींनी स्वतःच घमेले, फावडे घेऊन रस्त्यावरील चिखल दूर करण्यासाठी श्रमदान केले आहे. तर काहींनी रस्त्याचा उपयोग छोटा नाला म्हणूनच केला आहे.

    कर्मवीरनगरची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी झाली आहे. गोंधळे व इंगळे परिवार यांच्या वीस एकर जागेत ही वसाहत निर्माण झाली आहे. गुलमोहर कॉलनी, एकता नगर, कर्मवीर नगर (पूर्व भाग) अशा भागात अकराशे मतदार आहेत. प्रभाग क्रमांक एक म्हणून याठिकाणी एक नंबर सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा आहे. पण, सध्या या भागात स्थानिक लोकांपेक्षा भाडेकरूंची संख्या जास्त असल्याने लोकांना आपलं मत मांडता येत नाही.त्याचा अर्थ लोक संयमी आहेत असे काही लोकप्रतिनिधी यांना वाटत आहे. दरम्यान, याबाबत संबधित लोकांशी संपर्क साधला असता त्या रस्त्यावर लवकरच मुरूम टाकण्यात येईल असे सांगितले.