ऐन मंत्रिमंडळ बैठकीत बांधकाम मंत्र्याना कोरोनाची लागण झाल्याचा संदेश; बैठक घाईने सोडल्याने चर्चांना उधाण!

सकाळपासून चव्हाण यांनी वांद्रे येथे पक्ष प्रभारींसोबत महत्वाच्या बैठकीत भाग घेतला त्यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत ते हजर राहिले, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश आला, त्यानंतर घाईने त्यांनी घर गाठल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (Minister of Public Works) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

    दरम्यान ऐन मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक बैठकीतून बाहेर पडत चव्हाण यांनी शासकीय निवास स्थान गाठल्याने तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र काही वेळाने त्यांनीच ट्विट करत कोरोना पॉझीटिव्ह झाल्याचा चाचणीचा संदेश आल्याची माहीती दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनाही लागण झाल्याचे समोर आले आहे.

    दिवसभर व्यस्त कार्यक्रमात मग्न

    दरम्यान सकाळपासून चव्हाण यांनी वांद्रे येथे पक्ष प्रभारींसोबत महत्वाच्या बैठकीत भाग घेतला त्यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत ते हजर राहिले, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश आला, त्यानंतर घाईने त्यांनी घर गाठल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नाना पटोले, धीरज देशमुख, बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा ट्विट करत काळजी घेण्याचे अवाहन करुन आजारातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.