मीटर छेडछाड करणे पडणार महागात ! ५० हजारांच्या दंडासह होणार पोलीस कारवाई

ग्राहकाद्वारे वीजेचा वापर कशा पद्धतीने केल्या जाते. याची तपासणी महावितरणद्वारे केली जाते. यासाठी घरातील इलेक्ट्रीक साहित्य किती याचाही अंदाज घेतला जातो. अनेक ग्राहक निरनिराळी शक्कल लढवून वीज चोरी करीत असतात. यासाठी मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर फॉल्टी दाखविणे, तर काही ग्राहक अत्यंत कमी युनिट जाळल्याचे मीटरमध्ये दाखवितात.

    शिरपूर : वीजेच्या दरात झालेली भरमसाठ वाढ तसेच विजेचा वाढलेला अत्याधिक वापर, यामुळे नागरिक वीज बिल वाचविण्यासाठी वीज मीटरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, ग्राहकांची ही चोरी महावितरणाच्या निदर्शनास आली असून आता विद्युत चोरी केल्यास घरात कायमच्या अंधारास ५० हजार रुपयाचा दंड तसेच पोलीस कारवाईलाही संबधितांना सामोरे जावे लागण्याची नामुष्की ओढवणार आहे. यामुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर आपसुकच नियंत्रण मिळवणे महावितरणाला शक्य होणार आहे. संबंधित ग्राहकांच्या मागणीनुसार डिमांड भरल्यानंतर महावितरण कंपनीद्वारे वीज मीटर लावून देत विद्युत सेवा उपलब्ध करून दिली जाते.

    दरम्यान, ग्राहकाद्वारे वीजेचा वापर कशा पद्धतीने केल्या जाते. याची तपासणी महावितरणद्वारे केली जाते. यासाठी घरातील इलेक्ट्रीक साहित्य किती याचाही अंदाज घेतला जातो. अनेक ग्राहक निरनिराळी शक्कल लढवून वीज चोरी करीत असतात. यासाठी मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर फॉल्टी दाखविणे, तर काही ग्राहक अत्यंत कमी युनिट जाळल्याचे मीटरमध्ये दाखवितात. मात्र, वीजबील चुकविण्यासाठी केलेली ही हेराफेरी आता ग्राहकांना महागात पडू शकते. भारतीय विद्युत कायद्याच्या १३५,१३८,१२६ अंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करून फौजदारी खटला दाखल होऊ शकते. यामुळे वीजचोरी करण्यापूर्वी ग्राहकाना बराच विचार करावा लागणार आहे

    अशी होणार दंडात्मक कारवाई

    एखाद्या ग्राहकाने जर, वीज मीटरमध्ये फेरफार केली असेल तर, मीटर जप्त केल्या जाते. त्यानंतर मागील वर्षापर्यंतचे बिल वसूल केले जाते. यामध्येही दंडाची रक्कम भरावी लागते. दंड न भरण्यास पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केल्या जातो. यात किमान ५० हजार रुपया पर्यतची दंडाची तरतूद आहे.