
पोलिसांनी तात्काळ जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. दवाखान्याबाहेर पोलीस पहारा ठेवण्यात आला होता.
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील मेटकर्णी येथील एका सात महिन्याच्या बालकाच्या मृत्युच्या घटनेने श्रीवर्धनमधील वातावरण चांगलच तापलं आहे. श्रीवर्धन मेटकर्णी येथील युवराज राम वाघाटे वय सात महिने असलेला बालक आजारी असल्यामुळे ३ व ४ ऑक्टोबर रोजी डॉ. एम एम भरणे यांच्याकडे उपचारासाठी आणण्यात आलं होत. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी डॉ श्रीवर्धनकर यांच्याकडे उपचार घेण्यात आलं. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा डॉ भरणे यांच्याकडे युवराज यास उपचारासाठी आणण्यात आलं त्यावेळी डॉ भरणे यांनी युवराज यांना तपासून इंजेकशन दिलं.
त्यानंतर युवराजच्या आई वडिलांनी त्याला घरी घेऊन आले. त्यास तहान लागली असेल म्हणून ड्रॉपच्या साहाय्याने दोन थेंब पाणी पाजलं बाळ बेशुद्ध झाल्यामुळे बाळास पुन्हा डॉ. भरणे यांच्याकडे आणण्यात आलं डॉक्टर यांनी त्यास तपासून बाळास मयत घोषित केले. बाळाच्या झालेल्या मृत्यूमुळे त्यानंतर संतप्त जमावाने संबंधित दवाखान्यात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. दवाखान्याबाहेर पोलीस पहारा ठेवण्यात आला होता.
लहान बाळाच्या मृत्यूचे खरं कारण शोधण्यासाठी मृत शरीराचे शवविछेदन करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटने बाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू र. न ०१४/२०२३ अन्वये नोंद करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एम चौधरी करत आहेत.