मेट्रो सुरू झाली आणि त्यासोबतच वादालाही फुटले तोंड, आनंद नगर ऐवजी अप्पर दहिसर नाव स्क्रिनवर झळकल्याने लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट; नाव हटविण्याची केली मागणी

मागणीनुसार एम् एम आर डी ए आणि दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने मेट्रो शुरू होण्याआधीच या स्थानकाचे नाव बदलून अधिकृतपणे आनंद नगर नावाला स्वीकृती दिली आहे. देण्यात आलेले हे नाव स्थानक आणि प्लेटफॉर्म च्या फलकावर ही झळकले पण गुंदवली ते अंधेरी- पश्चिम पर्यंत मेट्रो सेवा शुरू होण्याच्या दिवशीच या स्थानकाच्या इंडिकेटर स्क्रीनवर आनंद नगर नाव नाहीसे होऊन पुन्हा अप्पर दहिसर असे झळकल्याने स्थानिक लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई : मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ (Metro 2 A and Metro 7) चे लोकार्पण होऊन अवघे दोनच दिवस झाले असताना आता नव्या वादाला (New Dispute) तोंड फुटले आहे. मेट्रो २ ए दहिसर – अंधेरी- पश्चिमच्या मार्गावर (Western Route) एका भागातील स्थानकाला अप्पर दहिसर असे नाव देण्यात आल्याने हा वाद उफाळून आला आहे. स्थानकाचे नाव बदलून देण्याची मागणी स्थानिकांनी (Locals Demands Change The Name)  केली आहे.

    मेट्रो २ ए दहिसर – अंधेरी- पश्चिम च्या मार्गावर दहिसर येथील आनंद नगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकाला आधी अप्पर दहिसर नाव जाहीर करण्यात आले होते स्थानिक लोकांनी या नावाला विरोध करुन आनंद नगर नावाच्या मागणीसाठी आनंद नगर रहिवाशांच्या वतीने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कर्णा अमिन, राजेश पंडया यांनी सर्व पाठ पुरावा केला होता.

    मागणीनुसार एम् एम आर डी ए आणि दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने मेट्रो शुरू होण्याआधीच या स्थानकाचे नाव बदलून अधिकृतपणे आनंद नगर नावाला स्वीकृती दिली आहे. देण्यात आलेले हे नाव स्थानक आणि प्लेटफॉर्म च्या फलकावर ही झळकले पण गुंदवली ते अंधेरी- पश्चिम पर्यंत मेट्रो सेवा शुरू होण्याच्या दिवशीच या स्थानकाच्या इंडिकेटर स्क्रीनवर आनंद नगर नाव नाहीसे होऊन पुन्हा अप्पर दहिसर असे झळकल्याने स्थानिक लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    प्राधिकरणाने नावाला स्वीकृती दिल्यानंतर स्क्रीनवर अप्पर दहिसर हे नाव झळकले कसे ? माहिती मिळताच कर्णा अमिन, राजेश पंडया , सुहास धानुका व वसाहतीतील लोकांनी स्टेशन व्यवस्थापक अरविंद माने यांच्याशी संपर्क साधून इंडिकेटर स्क्रीनवरील अप्पर दहिसर हे नाव तात्काळ हटवून आनंद नगर नावाची अस्मिता कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी केली आहे , सुधारणा न केल्यास स्थानका जवळील वसाहतीतील संतप्त लोकांकडून वेळप्रसंगी निर्दशने करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    या संदर्भात कांदिवलीचे मेट्रो व्यवस्थापक अरविंद माने यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.