मेट्रोच्या अधिकाऱ्याला बांबूने मारहाण; मूर्ती खरेदीसाठी दाेन लाख रुपयांची वर्गणी मागितली अन्…

मेट्रो पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याने गणेशोत्सवात मूर्ती खरेदीसाठी दाेन लाख रुपयांची वर्गणी न दिल्याने त्याला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    पुणे : मेट्रो पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याने गणेशोत्सवात मूर्ती खरेदीसाठी दाेन लाख रुपयांची वर्गणी न दिल्याने त्याला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    श्रीकांत संतोष मरळ असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत शरद उगले (वय ६२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    जंगली महाराज रस्त्यावर झेड ब्रीजजवळील खाऊ गल्लीत मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम एका कंपनीकडून करण्यात येत आहे. गणेश उत्सवात मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपये मरळ याने पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याकडे मागितले होते. त्यावेळी वर्गणी न दिल्याने मरळ चिडला होता. मरळने दांडके आणि फावड्याने अधिकाऱ्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.