एमजीएम इंजीनियरिंग इन्स्टिट्यूटचा एम्प्लॉयबीटी लाइफ बरोबर सहयोग

लाइफ आणि फेडरेशन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियासोबत धोरणात्मक सहयोग साधला आहे. या भागीदारी अंतर्गत संस्थेमध्ये एक फ्युचर ऑफ वर्क एक्स्पीरियन्स सेंटर स्थापन केले जाणार आहे

    जागतिक मनुष्यबळाचा भाग होण्यामध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आणि अनुभव यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी एमजीएम इंजीनिअरिंग इन्स्टिटूट्सने एम्प्लॉयलिबिटी. लाइफ आणि फेडरेशन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियासोबत धोरणात्मक सहयोग साधला आहे. या भागीदारी अंतर्गत संस्थेमध्ये एक फ्युचर ऑफ वर्क एक्स्पीरियन्स सेंटर स्थापन केले जाणार आहे, ज्याद्वारे नवी मुंबई आणि मेलबर्न येथील विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रकल्पाधारित संधी पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर फेडरेशन युनिव्हर्सिटीसोबत राबविला जाणारा फ्युचर ऑफ वर्क ट्रेनिंग हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा अखंडितपणे पाठपुरावा करण्यास तसेच भारतभरातून आणि ऑस्ट्रेलियातून मौल्यवान अनुभव प्राप्त करण्यास सक्षम बनविणार आहे.

    एम्प्लॉयलिबिटी लाइफचे सीईओ डॉ. मनीष मल्होत्रा यांनी शिक्षण आणि रोजगार यांतील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने या भागीदारीचे महत्त्व सांगितले. “ही भागीदारी शिक्षण आणि रोजगार यांमधील दरी सांधण्याप्रती आमच्या समर्पिततेचे उदाहरण आहे. उद्योगक्षेत्रातील धुरिणांच्या निकटसंपर्कात राहून काम करत आम्ही विद्यार्थ्यांना आधुनिक नोकऱ्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्यांनी सुसज्ज बनवू शकतो.”