
वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांच्या परिसरात सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हिंगोली : हिंगोलीच्या वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील जवळपास पंधरा ते सोळा गावांच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचा सौम्य हादरा जाणवला आहे. वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील गावांच्या परिसरात सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
रिश्टर स्केलवर 3.6 अशी या भूकंपाची नोंद झाली आहे. दरम्यान भूकंपाच्या या धक्क्यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.